Posts

Showing posts from November, 2026

मनाचे श्लोक १-५

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा! मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ! नमू शारदा मूळ चत्वार वाचा!  गमू पंथ आनंत या राघवाचा ||१|| गणाधीश, गणांचा अधिपती असलेला गणपती सर्व गुणांचा ईश म्हणजे स्वामी आहे यागुणांमध्ये सजीवांचे, निर्जीवांचे आणि प्रकृतिचे तीन गुण( सत्व, रज, तम ) यांचा समावेश होतो. सर्व वस्तूंचे मूळ गणपती हा ईश्वर आहे आणि दुसऱ्या बाजूने निर्गुण निराकार अशा आत्मस्वरूपाचेही मूळ म्हणजे आरंभ आहे. अशा गणतीला आणि विद्येची देवता सरस्वती म्हणजेच शारदा. चार वाणीं,वाचे मधून ( परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी) प्रगट होणाऱ्या सरस्वतीच्या अस्तित्वा ला वंदन करून श्री रामदास स्वामी म्हणतात, सगुण साकार अशा रामाची भक्ती च आपल्याला निर्गुण, निराकार अशा आत्मा रामा पर्यंत घेऊन जाऊ शकेल. म्हणून आपण सर्वांनी हा आत्मस्वरूपी राघवाकडे जाण्याचा मार्ग आक्रमावा. आत्मज्ञाना पर्यंत चा प्रवास दुष्कर व खडतर  आहे. याची समर्थांना जाणीव आहे. म्हणून मनाला कोणत्याही प्रकारची बळजबरी, हुकूम किंवा आदेश न देता ते मनाला समजावित आहेत. हे मना तू व मी असे या मार्गाने गमू म्हणजे जाऊ या, यातून समर्थांच्या प्रेमळपणा ची जाणीवही होते. !...

मनाचे श्लोक १-५

मना सज्जना कालच्या सत्संगात सुजाता ताईंनी मनाच्या श्लोकांवर अतिशय सुंदर सोप्या व सरळ भाषेत निरुपण केले. लहानपणी शिकलेले व पाठ केलेले मनाचे श्लोक विस्मरणात गेलेत कां ? खरं तर आता या वयातच मनाच्या अभ्यासाची खरी गरज आहे. मनाला संबोधून केलेला उपदेरा आचरणात आणला तर चंचल मनाला आवरणे, गोंजारणे, त्याला मित्र बनवून, योग्य विचारांचा पाठपुरावा करून त्याप्रमाणे वागणे राक्य होईल. सततच्या अभ्यासाने एकाग्रता साधून ईश्वर चरणी स्थिर होऊ शकेल. चला तर मग रोज एक श्लोक वाचूया. मनन करुया व आचराणात आणूया.